बामोशी बाबा उरुसानिमित्त तलवारीची मिरवणूक

0

चाळीसगाव । शहरातील बामोशी बाबा उर्फ मुसा कादरी बाबा ऊर्स निमित्त 13 एप्रिल 2017 रोजी पुज्य तलवारीची मिरवणुक जुनी नगरपालीका शेजारील भालचंद्र देशमुख यांच्या घराजवळील तलवार भवन येथून सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास काढण्यात आली. यावेळी ढोल ताश्याच्या गजरात मिरवणुकीला सुरूवात झाली, तलवार पकडण्याचा मान यावर्षी भालचंद्र देशमुख यांना मिळाला होता. धुनी पकडण्याचा विजय देशमुख यांना मिळाला होता तर तलवार दुवा पढण शहर ए काजी नाजीमोउद्दीन काझी यांनी केले. पुज्य तलवारीच्या दर्शनासाठी परीसरासह राज्यभरातुन हिंदु मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मान्यवरांनी घेतले तलवरीचे दर्शन
तलवारीचे दर्शन खासदार ए.टी. पाटील, आमदार उन्मेश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, प्रदीप देशमुख, झी चोवीस तास मुख्य निवेदक अजीत चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पं.स.उपसभापती संजय पाटील, विश्वास चव्हाण, रोशन जाधव, नगरसेविका विजया पवार यांच्यासह नगरसेवक पं.स. सदस्य लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी पुज्य तलवारीचे दर्शन घेतले.