बारामतीत दिशादर्शक फलकांचा अभाव; चालकांची गैरसोय

0

बारामती । बारामती नगरपरिषदेच्या स्ाुस्त कारभाराचा फटका जडवाहतूक करणार्‍या परप्रांतीय ट्रकचालकांना बसत आहे. शहरातील अत्यंत गजबजलेल्या इंदापूर चौकात दोन कंटेनर एका पाठोपाठ आल्याने तब्बल अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. हे ट्रकचालक कंटेनर घेऊन फलटणला निघाले होते. परंतू दिशादर्शक फलक नसल्याने सरळ शहरात आले. शहरातील वर्दळीच्या भागात घ्ाुसल्याने या ट्रकचालकांची भंबेरी उडाली. दिशादर्शक फलकांअभावी चालकांची मोठी गैरसोय होत असल्याचे या प्रकारावरून समोर आले.

हे ट्रकचालक भिगवणवरून सरळ बारामतीकडे निघाले. बारामती शहरात असलेल्या रिंगरोडवरून वळण्याच्याऐवजी शहरात घ्ाुसले. रिंगरोडला दिशादर्शक फलकच नसल्याने ट्रकचालकांना निश्‍चित असा रस्ता लक्षात येत नव्हता त्यामुळे ते सरळ रस्त्याने वर्दळीच्या ठिकाणी शहरात घ्ाुसले. रिंगरोडच्या सर्व ठिकाणी तसेच बाह्यवळण रस्त्यावर मोठे दिशादर्शक फलक बसवावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. नगरपालिकेस लेखी निवेदनही देण्यात आले आहे. मात्र नगरपारिषद याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. बारामती एमआयडीसीमुळे तसेच औरंगाबादवरून सातार्‍याला जाणार्‍या वाहन चालकांना हा जवळचा रस्ता आहे. त्याचशिवाय टोल आकारला जात नसल्याने चालक या रस्त्याला जास्त पसंती देतात. त्यामुळे जड वाहतूक या मार्गाने जास्त होत असते. परंतु नगरपालिकेस याचे काहीही सोयरसुतक नाही.

नामनिर्देशक फलक बसवा
इंदापूर चौकात सध्या गृहरक्षक दलाचे होमगार्ड कार्यरत आहेत. या होमगार्डनी ट्रकचालकांना व्यवस्थीत मार्गदर्शन करून व वाहतूक सुरळीत ठेवून सहकार्य केले. त्यामुळे ट्रकचालक निघ्ाून गेले. अन्यथा या चौकातील वाहतूक चांगलीच खोळंबली असती. निदान आता तरी या घटनांचा बोध घेऊन नगरपालिका प्रशासनाने सर्व वळण रस्त्यावर नामनिर्देशक फलक ठळक स्वरुपात दिसतील, असे बसवावेत अशी नागरीकांची मागणी आहे.