बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांवर कार्यवाही

0

गणेशमूर्ती विसर्जन विटंबना प्रकरण

बारामती : बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व एनव्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचा अध्यक्ष व त्यांचे इतर पदाधिकारी यांना अटक करून त्यांचेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा अर्ज भाजपचे पदाधिकारी सुरेंद्र जेवरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला होता. याची दखल जिल्हा प्रशासन अधिकार्‍यांनी घेतली असूनलवकरच कार्यवाही करण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे.

नगरपरिषदेने मूर्ती विसर्जन करताना विटंबना झाल्याबाबत तसेच अत्यंत वाईटपद्धतीने काम केल्याचे अर्जामधील मजकूरावरून दिसून येत आहे. याप्रकरणी नगरपालिकेने आपले म्हणणे ही नोटीस मिळाल्यापासून चोवीस तासात सादर करावी. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून त्याबाबत आपले म्हणणे वेळेत सादर न केल्यास व ते योग्य नसल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र नागरीसेवा, शिस्त, अपिल, नियम 1979 मधील नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. नगरपालिकेने दान म्हणून गणेश विसर्जनावेळी गणेश मूर्ती घेतलेल्या होत्या. मात्र या गणेशमूर्तीचे विसर्जन न करता कचरा डेपोत नेण्यात आल्या होत्या अशी तक्रार सुरेंद्र जेवरे यांनी जिल्हाधिकारी तसेच पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलिस अधिक्षक यांच्याकडेही केली होती.