नाशिक विभागाचा 86.13 टक्के निकाल
जळगाव । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल यंदा 88.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 92.36 टक्के इतका लागला आहे. तर 85.23 टक्के मुलं पास झाली आहेत. यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच 94.85 टक्के इतका निकाल लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा 86.13 टक्के इतका निकाल लागला आहे. नाशिक विभागात मात्र धुळे जिल्ह्याने 88.87 टक्के निकाल लागल्याने खान्देशात अव्वल आला आहे. त्यात नाशिक – 86.85 टक्के, धुळे- 88.87 टक्के, जळगाव – 84.20 टक्के आणि नंदुरबार जिल्ह्याचा -84.70 टक्के निकाल लागला आहे.
*विभागानुसार निकाल याप्रमाणे
कोकण- 94.85 टक्के, कोल्हापूर- 91 टक्के, औरंगाबाद- 88.74 टक्के, पुणे- 89.58 टक्के, नागपूर- 87.57 टक्के, लातूर- 88.31 टक्के, मुंबई- 87.44 टक्के, अमरावती- 88.08 टक्के, नाशिक- 86 .13 टक्के
*जळगाव (तालुकानिहाय निकाल टक्केवारीमध्ये)
अमळनेर – 93.08, भुसावळ-81.97, बोदवड-82.11, भडगाव – 83.86, चाळीसगाव-76.94, चोपडा-84.82, धरणगाव-87.76, एरंडोल-79.84, जळगाव- 77.19, जामनेर-91.71, मुक्ताईनगर-82.32, पारोळा-77.40, पाचोरा-85.65, रावेर-81.24, यावल-86.47 आणि जळगाव शहर-85.87 असा निकाल जाहिर झाला आहे.
*धुळे (तालुकानिहाय निकाल टक्केवारीमध्ये)
धुळे- 83.72, साक्री-90.12, शिरपूर- 96.56, शिंदखेडा-86.46, धुळे शहर-87.76 असा निकाल लागला आहे.
*नंदुरबार (तालुकानिहाय निकाल टक्केवारीमध्ये)
अक्कलकुवा- 76.38, धडगाव-80.07, नंदुरबार-88.86, नवापूर-79.01, शहादा-88.98, तळोदा-84.42 असा निकाल आहे.
*नाशिक (तालुकानिहाय निकाल टक्केवारीमध्ये)
चांदवड- 78.63, दिंडोरी- 83.10, देवला- 84.15, इगतपुरी- 83.56, कालवण- 94.41, मालेगाव- 84.71, नाशिक- 82.21, निफाड- 85.41, नांदगाव- 85.09, पेठ- 86.64, सुरगाणा- 90.87, सटाणा- 81.14, सिन्नर- 92.03, त्र्यंबकेश्वर- 80.76, येवला- 90.87, मालेगाव शहर- 89.29, नशिक शहर- 88.30