पाचोरा । बारावीत मिळालेले यश हे जिवनाला मार्ग देणारे आहे. जगाच्या स्पर्धेत आपले वेगळे अस्तित्व सिध्द करण्यासाठी ही शिदोरी पाठबळ देणारी आहे. स्पर्धेत यश मिळवतांना नविन आव्हाने पेलवने सोपे नाही. पण महाविद्यालयात मिळालेली शिकवण जगतांना मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन मार्गदर्शन माजी आमदार दिलीप वाघ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात केले.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एम.एम.महाविद्यालयात आज बारावीच्या विविध शाखांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पाल्यांसोबत गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
बारावीच्या विविध विभागात प्राविण्या मिळविणार्या विद्यार्थ्यांचा केला सत्कार
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलिप वाघ हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन व्यापिठावर संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन व्ही.टी.जोशी, डॉ. जयवंत पाटील, सुभाष तोतला, सतिष चौधरी, हारूण देशमुख, नितिन तावडे, प्राचार्य डॉ.बि.एन.पाटिल, प्रा.एस.डी.थोरात, प्रा.ए.बी.बोरसे, प्रा.सि.एन.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. बि.एन.पाटिल केले. याप्रसंगी विज्ञान विभागाचा पहिला प्रतिक साळूंखे (87.53), दुसरा निखिल सोनार (83.7), अजय सोनार(81.23) व राघव केजरीवाल (81.23), वाणिज्य विभागात पहिली रश्मी रोहिडा (84.62), दुसरा तरुण भावनानी(84.31), तिसरी वनिता रतनानी (78.92), साहित्य विभागात पहिली अंजली पाटिल (77.91), दुसरी रेवती पाटिल (76.76), तिसरी धनश्री राजपुत (73.23), किमान कौशल्य विभागात अकाउंटमध्ये पहिला भुषण पाटिल (65.92), एम.एल.टी विभागात पहीली प्रियंका बाविस्कर (60.15), मार्केटिंग आणी सेल्समनशिप विभागात पहिली चतना रामचंद्र पाटिल (58.76).
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा.अतुल सुर्यवंशी यांनी तर आभार प्रा.ए.बी.बोरसे यांनी मानले. 12 वीच्या विद्यार्थ्यांना तासिके व्यतेरिक्त वयक्तिक लक्ष देणारे डॉ.वासुदेव वले, डॉ.एस.एम.पाटिल, प्रा.एस.डी.थोरात, प्रा.आर.एस.मांडोळे, प्रा.के.आर.पाटिल, प्रा.बी.एन.निकम, प्रा.जी.बी.पाटिल, प्रा.नितिन पाटिल, प्रा.पी.व्ही. देसले, प्रा.स्वप्निल ठाकरे, प्रा.बी.एस.पाटिल, प्रा.महेंद्र पाटील, प्रा.एस.आर.चांडक, प्रा.गौरव चौधरी, प्रा.एस.बी. गुंजाळ, प्रा.शैलेजा पाटिल, प्रा.सुनिता सोहत्रे, प्रा. मनिषा चव्हाण, प्रा.वैशाली बोरकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी परीश्रम घेतले.