बारावीच्या परीक्षेत शीतल वाडेकरचे यश

0

धुळे । धुळे येथील जिल्हा नियोजन अधिकारी एम.आर.वाडेकर यांची पुतणी व मोहननाथ वाडेकर यांची कन्या शीतल वाडेकर हिने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. ती अमरावती येथील पी.आर.पोटे पब्लीक स्कुलची विद्यार्थिनी होती. तिने सी.बी.एस.ई. पॅटर्नच्या बारावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळवीत यश संपादन केले. शितल वाडेकर हिने पी.आर.पब्लीक स्कुलचे शिक्षकवृंदासह आई वडिलांचे मिळालेले मोलाचे मार्गदर्शन कामी आल्याची भावना व्यक्त केली.