बारावीच्या परीक्षेला लोणावळ्यातून 1,450 विद्यार्थी

0

लोणावळा । बुधवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला लोणावळा शहरातून 1 हजार 450 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. शहरातील तीन परीक्षा केंद्रात या परीक्षा घेण्यात येत असून शास्त्र शाखेतील 350, कला शाखेतील 150 तर वाणिज्य शाखेतील 950 विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. शहरातील मुख्य परीक्षा केंद्र असलेल्या व्ही.पी.एस. हायस्कूलसह लोणावळा महाविद्यालय आणि डॉन बॉस्को हायस्कूल या उपकेंद्रामध्ये सकाळी 10 वाजल्यापासूनच पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन त्यांची बैठक व्यवस्था शोधून देण्यासाठी गर्दी केली होती.

कॉपी बहाद्दरांवर कडक कारवाई
परीक्षेत बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 750 विद्यार्थ्यांची व्ही.पी.एस. हायस्कूल मध्ये, 350 विद्यार्थ्यांची डॉन बॉस्को हायस्कूल मध्ये तर 349 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था लोणावळा महाविद्यालयात करण्यात आली आहे. 11 वाजल्यापासून सुरू होणार्‍या पेपर पूर्वी यंदा पहिल्यांदाच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना 10.30 वाजता परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. 15 दिवस सुरू राहणार्‍या या परीक्षेसाठी लोणावळा शहर पोलिस ठाण्याकडून पुरेसा बंदोबस्त पुरविण्यात आला असून परीक्षेदरम्यान कॉपी करणार्‍या कॉपी बहाद्दरांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्य केंद्रप्रमुख प्राचार्य देशपांडे यांनी सांगितले.