जळगाव । राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. शिक्षण मंडळ कॉपीमुक्त अभियान राबवित असले तरी विद्यार्थ्यांनी मात्र या अभियानाला ठेंगा दाखविला. तसेच काही परीक्षा केंद्रावर अक्षरष: कॉप्यांचा पाऊस पडलेला दिसून आला.शिक्षण विभागाकडून बारावीच्या परीक्षांवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक उपाय योजना केली होती. यावेळी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यापूर्वी शिक्षकांकडून कसून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कसून तपासणी करुन देखील परीक्षेच्या वेळी वर्गातून कॉप्यांचा पाऊस पडत असल्याचे चित्र काही परीक्षा केंद्रांवर दिसून आले. तसेच परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिस बंदोबस्त असून देखील पोलिस कॉपी पुरवण्यासाठी आलेल्यांकडे दुर्लक्ष करीत होते. तर काही परीक्षा केंद्रांवर कॉपीबहाद्दर धुमाकूळ घालत होते. त्यामुळे खिडकीजवळ असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागत होता. तर तसेच या होणार्या त्रासाकुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवितांना त्यांचे लक्ष विचलीत होत असल्याचे परीक्षार्थीकडून पालकांना सांगीतले जात होते. तसेच पहील्याच पेपरला कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा झाल्याचे चित्र दिसून आले.
चक्क झाडांचा वापर
शहरातील उपद्रवीकेंद्र असलेल्या ऍग्लो उर्दू हायस्कूलमध्ये एका वर्गाच्या खिडकीजवळ झाड असल्याने विद्यार्थ्याने चक्क झाडाच्या फांदीचा वापर हा कॉपी ठेवण्यासाठी केला असल्याने झाडाच्या फांदीने कॉपीला आधार दिला होता. परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांची कसून तपासणी करुन त्यांना आत सोडण्यात आले. पेपर सुटल्यानंर परीक्षा केंद्रा बाहेर कॉप्यांचा पडल्या असल्याने कॉप्यांचा सडा मारल्याचे दृष्य दिसून येत होते.