अमराळे गावावर शोककळा ; दरवाजा उघडल्याने दुर्घटना
शिंदखेडा– बारावी गणिताचा पेपर देऊन घराकडे परतणार्या विद्यार्थ्याचा बसचा दरवाजा अचानक उघडल्याने खाली पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. या घटनेने शिंदखेडा तालुक्यातील अमराळे गावात शोककळा पसरली. विक्की सुदाम बोरसे (17, रा़ अमराळे) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून शिंदखेडा येथे तो शनिवारी पेपर देण्यासाठी आल्यानंतर दुपारी शिंदखेडा-वाडी बस (क्रमांक एम.एच.20 डी.9473) ने घराकडे निघाला असताना शिंदखेड्यापासून काही अंतरावर बसचा दरवाजा अचानक उघडल्याने विक्की हा जमिनीवर कोसळला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. विक्की हा कुटुंबियांचा एकुलता एक होता. या घटनेनंतर अमराळे गावावर शोककळा पसरली. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परीवार आहे.