बारावी परीक्षेत गणितात जिल्ह्यातील सहा विद्यार्थी ‘आऊट’

0

भरारी पथकाची धडक कारवाई ; कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा

जळगाव– कॉपीमुक्त अभियानाचा जिल्ह्यात बोजवारा उडाला असतानाच शनिवारी पुन्हा गणिताच्या पेपराला कॉपी करणार्‍या सहा विद्यार्थ्यांना भरारी पथकाने डीबार केले. त्यात बहादरपूर येथील रा.का.मिश्र विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील एक तर देवगावच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गणित व के.के.विषयाच्या विद्यार्थ्याला डाएटचे प्राचार्य गजानन पाटील यांनी डीबार केले. यावलमधील डॉ.जाकिर हुसेन उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन तर भुसावळच्या डी.एस.हायस्कूलमधील एका विद्यार्थ्यास राज्य मंडळाच्या सदस्य प्रा.शुभांगी दिनेश राठी यांनी डीबार केले.