बारी समाजातर्फे पारितोषिक वितरण

0

रावेर। बारी वाडा येथे सुर्यवंशी बारी समाज बहुउद्देशीय संस्था व नागवेल युवा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने संत रुपलाल महाराज पुण्यतिथी निमित्त विविध स्पर्धां घेण्यात येऊन दुसर्‍या दिवशी स्पर्धेत उत्तीर्ण गुणवंतांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला, सामान्य ज्ञान, शुद्धलेखन, रांगोळी, वकृत्त्व, गीत गायन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन सुर्यवंशी बारी समाज बहुउद्देशीय संस्थेंचे विश्वस्त सुधाकर अस्वार, भगवान बारी, पुण्यतिथी समिती अध्यक्ष दिपक जंजाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सत्यनारायणाचा प्रसाद वाटप करण्यात येऊन स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभास प्रारंभ करण्यात आला.

विजयी स्पर्धकांमध्ये यांचा आहे समावेश
यात चित्रकला स्पर्धेत 5 ते 8 वी गटात प्रथम ओम बारी, द्वितीय यश बारी, तृतीय यश मुकेश बारी, 9 ते 12 वी गटात प्रथम मंजुषा पाटील, द्वितीय सचिन बारी, तृतीय गौरव बारी, सामान्य ज्ञान स्पर्धेत 5 वी ते 8 वी गटात प्रथम विश्वेश बारी, द्वितीय गौरव बारी, तृतीय ऋषीकेश बारी, 9 ते 12 वी गटात प्रथम चेतन पाटील, द्वितीय मयुरी बारी, तृतीय योगेश बारी, शुद्धलेखन स्पर्धेत 5 वी ते 8 वी गटात प्रथम अभिजित बारी, द्वितीय प्रियंका बारी, तृतीय विशाल बारी तर 9 ते 12 वी गटात प्रथम मयुरी बारी, द्वितीय कोमल पाटील, तृतीय नयना जंजाळकर, रांगोळी स्पर्धेत महिला गटात प्रथम ममता बारी, द्वितीय अर्चना मुळकुटकर, तृतीय भारती बारी, मुलींच्या गटात प्रथम गायत्री बारी, द्वितीय दिव्या बारी, तृतीय पल्लवी बारी, वकृत्त्व स्पर्धेत प्रथम मयुरी बारी, द्वितीय विश्वेश बारी, तृतीय यश बारी, गीत गायन स्पर्धेत सर्वांना उत्तेजनार्थ प्रमाण पत्र देण्यात आले.

कार्यक्रमास यांची होती प्रमुख उपस्थिती
तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांना गौरवपत्र व सन्मान चिन्ह समाजाचे अध्यक्ष भागवत बारी, सुधाकर बारी, उपाध्यक्ष ताराचंद बारी, बर्‍हाणपूर युवा प्रकोष्ठ अध्यक्ष शाम बारी, संदिप पाटील, बाळकृष्ण बारी, कडू बारी, सुनिता पाटील, शितल बारी, शांताबाई अस्वार, मिना जंजाळकर, पार्वता बारी, उषा बारी, भारती बारी, हिरामण बारी, पंडीत बारी, योगेश पाटील, मनोज बारी, दिलीप बारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

परिक्षक म्हणून सरदार हायस्कूलचे कला शिक्षक व्ही.के. ठोसर व बा.ना. पाटील, दिलीप वैद्य यांनी काम पाहिले. प्रास्ताविक राहुल अस्वार यांनी केले. सुत्रसंचलन सहसचिव पंकज बारी तर आभार अध्यक्ष दिपक जंजाळकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रदिप बारी, पराग बारी, किरण बारी, चंद्रकांत पाटील, प्रमोद कोल्हे, पवन बारी, समाधान बारी, सचिन बारी, महेश बारी, योगेश बारी, निलेश पाटील, अशोक पाटील, दत्तू बारी, विजय जंजाळकर, नकुल बारी, शुभम बारी, चेतन बारी, श्रीराम बारी, नितीन बारी, मंगल बारी, सोपान बारी, संजय बारी, कुणाल बारी, अविनाश बारी, संदिप बारी आदींनी परिश्रम घेतले.