रावेर: बारी समाजातील नव्या पिढी समोर आदर्श निर्माण व्हावा म्हणून नागवेल युवा फाऊंडेशनतर्फे विवाह योग्य इच्छुक युवक-युवती यांचा भव्य परिचय मेळावा आयोजित केला होता. तर अत्यंत आकर्षक बहुरंगी समाजपोयोगी वेली बंधनाची या परिचय पुस्तकाचे देखील थाटात प्रकाशन करण्यात आले. रावेर येथील कमलाबाई मुलींचे महाविद्यालय याठिकाणी या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी समाजाचे सुधाकर ओंकार आस्वार हे होते.