बालकाचा झोळीत श्‍वास गुदमरून मृत्यू

0

पारोळा- झोळीत श्‍वास गुदमरून दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना पारोळा येथील कासार गल्ली भागात गुरुवारी दुपारी वाजता घडली.

कासार गल्लीतील रहिवासी तथा बाजार समिती संचालक प्रकाश नामदेव वाणी नगरसेविका सुनीता वाणी यांच्या कन्या जागृती आतीश वरखेडे यांचे सासर नाशिक येथील आहे. त्या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पारोळा येथे माहेरी आल्या होत्या. घरी फक्त प्रकाश वाणी यांची सून अश्‍विनी स्वत: जागृती ह्याच होत्या. दुपारी ते 1.30 वाजेच्या दरम्यान जागृती यांनी आपला दीड वर्षाचा मुलगा सोहम यास झोळीत टाकले होते. झोळीतून पडू नये, यासाठी झोळीच्या मध्यभागी एक ओढणी बांधलेली होती. दुपारी वाजता जागृती या आपल्या दीड वर्षाच्या बाळाला झोळीत बघायला गेल्या, तर त्याच्या तोंडाला फेस आला होता. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता भाऊ चेतन हा धावत आला. त्याने बाळाला उठवण्याचा प्रयत्न केला; पण बाळाने प्रतिसाद दिल्याने त्याला तातडीने डॉ. रवींद्र नावरकर यांच्याकडे नेण्यात आले. मात्र, श्‍वास गुदमरून बाळाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. या घटनेने समाजमन मात्र, सुन्न झाले.