कलासंचालनालय व पुणे जिल्हा परिषद आयोजित स्पर्धा
निगडी : तळवडे रुपीनगर येथील कै. प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक विद्यालयाचा दुसरीतील विद्यार्थी तेजस हारकळ याला बालचित्रकला स्पर्धेत जिल्हा पातळीवर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तर जगताप प्रतिशा धवलू, चौथीमधील पुनम शिंदे तर सातवीतील संतोष लोहार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. कलासंचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मुकुल तांबोळी आणि शिक्षणाधिकारी डॉ. गणपती मोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक जाधव यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती काळबांडे यांच्यासह कार्यानुभव शिक्षक राहुल माने, संजय पाटील यांनी विद्यार्थी आणि कलाशिक्षकांचे अभिनंदन केले.