चाळीसगाव-माझी अभिनयाची कारकीर्द बालनाट्य स्पर्धेपासून सुरु झाली ती वयाच्या 65 वर्षापर्यंत सुरू आहे नाटकाच्या प्रेक्षकांमध्ये मोठा बदल झाला आहे. शहरी भागात जो तो स्मार्ट फोनच्या विळख्यात अडकला आहे. या आभासी जगात नाटक ही जिवंत कला टिकून राहावी यासाठी येत्या काळात बालनाट्य महोत्सव आयोजित करून नाटकांची ओळख निर्माण व्हावी याकरिता नाट्य चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे असे मत ज्येष्ठ विनोदी अभिनेत्री तथा पद्मश्री पुरस्कार विजेत्या नयना आपटे यांनी केले आहे.
रंग गंध कलासक्त न्यास व माता अनुसया फाऊंडेशन आयोजित व टाकळी प्र दे येथील अश्वमेध पब्लिक स्कूल प्रायोजित बाल नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या नाटकांमध्ये त्यांची प्रमुख भूमिका असल्याने त्यांचे शहरात आगमन झाले. त्यांनी या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना भेट देऊन संवाद साधला यावेळी व्यासपीठावर अन्यया फाऊंडेशन व अश्वमेध पब्लिक स्कूलच्या संस्थापिका अश्विनी सुभाष पाटील, लेखक निर्माता दिग्दर्शक प्रवीण कुमार भारदे , रंग गंध कलासक्त न्यासाचे अध्यक्ष डॉ मुकुंद करंबळेकर , दैनिक जनशक्ति चे चाळीसगाव विभागीय कार्यालय उपसंपादक अर्जुन परदेशी , ,स्कूलच्या प्राचार्य उज्वला निरखे, जनसंपर्क अधिकारी पीयूष गुप्ता यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने विनोदी अभिनेत्री नयना आपटे यांचे जोरदार स्वागत केले त्या पुढे म्हणाल्या की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नाटक पाहता यावी म्हणून मी गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने बालनाट्य चळवळीशी निगडित राहिली आहे स्मार्टफोन इंटरनेट ट्विटर फेसबुक यांच्या जाळ्यात तरुण पिढी अडकत चालली आहे, त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी बालनाट्य चळवळीचा मोठा वाटा राहणार आहे याकरिता शहरा-शहरातून विशेषत बाल नाट्य महोत्सवा चे आयोजन केले पाहिजे टाकळी प्रदे सारख्या ग्रामीण भागातील शाळेने बाल नाट्य महोत्सवाची जबाबदारी घेणे हे खरच कौतुकाची गोष्ट आहे आणि या भावनेनेच मी या विद्यार्थ्यां शी संवाद साधायला आले आहे यावेळी लेखक निर्माता दिग्दर्शक प्रवीण कुमार भार दे यांनी विद्यार्थ्यांना भरपूर वाचन करण्याचा सल्ला दिला. नाटकाची पुस्तके गोष्टी वर्तमानपत्रे यांचे अधिकाधिक वाचन करून एकांकिका स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा, एकपात्री प्रयोग व बाल नाटिका बसवून आपल्यातला कलाकाराला वाव द्यावा यासाठी भविष्यात माता अनुसया प्रोडक्शन च्या वतीने भव्य कार्य शाळेचे आयोजन ग्रामीण भागा साठी लवकरच घेण्याचा मानस आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापिका अश्विनी पाटील तर सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले यावेळी दूरदर्शन मालिका नानी आजी मधील संवाद म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली