बालमहोत्सवात खडके बुद्रुक बालगृहातील मुलांचे यश

0

जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण
जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होते बालमहोत्सवाचे आयोजन
एरंडोल – तालुक्यातील खडके बुद्रुक येथील मुलांचे बालगृह खडके बुद्रुक आणि मुलींचे बालगृहातील संस्थेतील मुल आणि मुलींनी महिला आणि बालविकास कार्यालय जळगाव यांचे विद्यमाने २९ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजीत बालमहोत्सवात सहभाग घेवून विविध स्पर्धेत यश संपादन केले.

विविध स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी
यावेळी खडके बु.बालगृहातील मुलांमधून २०० मिटर धावणे या स्पर्धेत – सौरभ पाटील याने प्रथम क्रमांक, लांबउडी स्पर्धेत – सौरभ पाटील प्रथम क्रमांक, १००मिटर धावणे – हेमंत कोळी, व्दितीय क्रमांक, तर सामुहिक नृत्य स्पर्धेत- शंकर पाटील, हेमंत कोळी, अक्षय माळी, निरंक सोनवणे, दिपक कोळी, किशोर वानखेडे, अमोल पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. सर्वात लहान बालक तेजस कोळी यांनी सहभाग घेतला होता. तसेच मुलींच्या संस्थेतील कुसुम पाटील हिने २०० मिटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक, लांबउडी स्पर्धेत कुसुम पाटील व्दितीय, २०० मिटर धावणे स्पर्धेत अंजली वानखेडे व्दितीय क्रमांक, निबंध स्पर्धेत प्रियंका पाटील व्दितीय, सांस्कृतीक कार्यक्रमात सामुहिक नृत्यात -किल बिल -किल बिल पक्षी बोलती’ या नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. यात पायल गर्दे, वैष्णवी लंके, अश्वीनी गर्दे, देवश्री बडगुजर, जयश्री विसपुते, नम्रता झोपे यांनी सहभाग घेतला होता. लावणी नृत्य -येऊ कशी कशी मी नांदायला या नृत्यात रिया गर्दे व अंजली वानखेडे यांनी सहभाग घेतला व त्याना व्दितीय क्रमांक मिळाला.

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण
विजेत्यांना जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. शिंदे साहेब यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना पारितोषिके मिळाली. यात ट्राफी,मेडल, प्रमाणपत्र देण्यात आले. पारितोषिक मिळालेल्या मुलांचे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी आर.बी.काटकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी एस.आर.पाटील, परिविक्षा अधिकारी श्रीमती मेतकर, जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्षा वैजयंती तळेले, संस्था अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी सर्व विजेत्या बालकांचे कौतुक केले. बालगृहातील मुलांना अधीक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे, ज्ञानेश्वर पाटील, सारिका पाटील, धनंजय शेवाळे, हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.