बालसुधारगृहात मुला-मुलींना जिवनोपयोगी वस्तूंचे वाटप

0

जळगाव । महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा ओबीसी सेलच्यावतीने 21 रोजी बालुधारगृहामधील मुला-मुलींना फळवाटप, जिवन उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतिष पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, गुलाबराव देवकर, रविंद्र पाटील हे उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष विकास पाटील, युवक अध्यक्ष योेगेश देसले, उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेल विभागीय अध्यक्ष दिलीप पवार, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, उद्योगपती संतोष इंगळे, अल्पसंख्यांक महाराष्ट्र कमिटी सदस्य अशपाक मिर्झा, नगरसेवक चेतन सनकत, पाचोरा तालुकाध्यक्ष शालीग्राम मालकर, अपंग अध्यक्ष काशिनाथ इंगळे, राष्ट्रीय सदस्या माधुरी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

साहित्य वाटप प्रसंगी यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा ओबीसी सेल महानगर प्रभारी अध्यक्ष नंदू पाटील, प्रदेश सरचिटणीस सविता बोरसे यांनी केले. कार्यक्रमास निला चौधरी, ममता तडवी, स्मिता भांडारकर, अर्चना कदम, यमुनाबाई पाटील, शोभा तायडे, भिकन जोशी, फारुक अहलेकार, भिकन माळी, गोविंदा कुंभार, मनोज चौधरी, चंदू चौधरी, तोहसिब शेख, सचिन जोशी, अनिल पाटील, इरफान शेख, गोलू गवळी, अकबरभाई आदी पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णा माळी यांनी तर आभार नंदू पाटील, सविता बोरसे यांनी मानले.