बालाजी ट्रेडर्ससमोरून चोरट्यांनी दुचाकी लांबवली

A two-wheeler worth ten thousand rupees from Bhusawal city भुसावळ : शहरातील खडका चौफुली भागातील बालाजी ट्रेडर्स समोरून दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाजारपेठ पोलिसात चोरीचा गुन्हा
तक्रारदार राजेश मधुकर झोपे (गायत्री शक्तीपीठ, पुरूषोत्तम नगर, भुसावळ) यांनी दुचाकी (एम.एच.19 डी.6520) ही खडका चौफुलीवरील बालाजी ट्रेडर्ससमोर लावली असता चोरट्यांनी शनिवार, 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4.10 वाजेच्या सुमारास संधी साधून ती लांबवली. तपास नाईक भूषण जैतकर करीत आहेत.