बालाजी प्रतिष्ठानतर्फे रुग्णवाहिका लोकार्पण

0

सांगवी : भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी स्वखर्चातून आणलेल्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री गिरीश बापट व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गुरूवारी लोकार्पण करण्यात आले. आमदार जगताप यांचे वडील पांडुरंग जगताप यांच्या स्मरणार्थ सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव तसेच शहराच्या इतर भागातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी बालाजी प्रतिष्ठानतर्फे रुग्णवाहिका कार्यरत राहिल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.