बालाजी महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण उत्साहात

0

पिंपरी-चिंचवड : ताथवडे येथील बालाजी कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्सचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी विविध क्रीडाप्रकारांमधील विजयी संघ,शंभर टक्के उपस्थिती, वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी अशा 80 विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रशस्ती पत्रके देण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थापक कर्नल डॉ. ए. बालसुब्रमान्यम होते.

संचालक डॉ. जी. के. शिरुडे यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ.गणपतराव शितोळे, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. डिम्पल सैनी यांनी प्रास्ताविक केले. प्रा.अरुण वानखडे, प्रा.मोनिका कुलकर्णी यांनी नियोजन केले. डॉ. जयश्री नाम्बियार यांनी आभार मानले.