पिंपळे सौदागर : येथील एका हौसिंग सोसायटीच्या आवारात खेळणार्या आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. शिवकुमार बंडप्पा नवाखंडे (वय 55 रा. लोंढे वस्ती, ताथवडे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडीत मुलगी रविारी दुपारी दोनच्या सुमारास खेळत होती. आरोपीने मुलीला बोलावून घेतले आणि तीच्यासोबत अश्लिल चाळे केले. घडलेला सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला. यानंतर तात्काळ सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर आरोपी शिवकुमार याला मंगळवारी अटक केली. त्याच्यावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.