पिंपरी – चिंचवड : 19 वर्ष पूर्ण झालेल्या गेनबा सोपानराव मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी एक नवीन सॉफ्टवेअर लॉंच करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अतिशय महत्वपूर्ण सॉफ्टवेअर असून हे विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत वापरता येणार आहे.
‘GSMCOE’ नावाचे हे अॅप गुगल प्ले स्टोअर मधून सहज डाऊनलोड करता येणार आहे. या अॅप द्वारे विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी शिक्षक आपल्या मोबईलद्वारे वर्गातच घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांना घरबसल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती अॅप द्वारे पहाण्यास मिळणार आहे. आजी – माजी सर्व विद्यार्थ्यांना या अॅपचा उपयोग आगामी कार्यक्रमांची माहिती सूचना मिळण्यास होणार आहे. डीजीटलायझेशनचा आग्रह ठेवणाऱ्या राजाभाऊ मोझे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. अभिजित औटी यांच्या पुढाकाराने या अॅपचे अनावरण करण्यात आले आहे. झेरटॉन इंजिनीअरींग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे हे सॉफ्टवेअर बनवण्यात आले आहे.
गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना गैरहजरी बाबत मेसेज लगेचच मिळणार आहे. या द्वारे आपल्या पाल्यावर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. या अॅप द्वारे शिक्षकांचे कागदी कामकाज कमी झाले आहे.
ह्या संस्थेशी सलंग्न नसणाऱ्या कुठलाही व्यक्ती हे अप्प गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून आणि लॉगीन न करताही कॉलेज बद्दलची सर्व माहिती बघू शकेल. याचा फायदा बाहेरगावच्या पालकांना त्यांच्या पाल्याच्या प्रवेशावेळी होईल.