हिंजवडी : बालेवाडी स्टेडियम येथे कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी गेलेल्या एका प्रेक्षकाची सोन्याची चेन चोरटयांनी चोरली. ही घटना शनिवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास बालेवाडी स्टेडियमवर कुस्ती स्पर्धा गेटवर घडली. परसराम नारायण सोनी (वय 57, रा. वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथे श्री छत्रपती शिवाजी स्टेडियमवर कुस्ती स्पर्धा सूरु आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी फिर्यादी परसराम गेले होते. कुस्ती स्पर्धेच्या स्टेडियमवर प्रेवेश करताना गेट वर त्यांच्या गळ्यातील 65 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने चोरून नेली. यावरून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.