बाल तरुण मंडळातर्फे विशेष मुलांकडून पथनाट्याचे सादरीकरण

0

पुणे । पौड फाटा येथील बाल तरुण मंडळातर्फे स्व-रुपवर्धिनी या संस्थेने राजकीय तेढ व जातीयवाद करण्यासाठी समाजकंटकाकडून महापुरुषांची होणारी विटंबना त्यामुळे सामाजिक शातंता व सुव्यवस्थेस पोहचणारी हानी याविषयी पथनाट्य सादर केले. त्याद्वारे रस्त्यावर, मॉल, हॉटेल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी स्वमग्न मुले पालकांसोबत दिसल्यास आपणहून त्यांना मदतीचा हात देऊन या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा संदेश दिला महापुरुषांची विटंबना, ब्लू व्हेल गेम, धोकादायक सेल्फी या विषयांवर स्वरूपवर्धिनी संस्थेने अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण केले.

सावली संस्था व एरंडवणा भागातील स्वमग्न मुलांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. विनायक पाटील, चिरायू धापेकर, सोनाली स्वामी, सुचित्रा ठिपसे, सिद्धान्त ठिपसे, यशराज मिसळ, श्रेयांस शेट्टी, सावली संस्थेचे वसंत ठकार, असीम सरोदे, मंडळाचे सभासद, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.