इसिएतर्फे राबविला उपक्रम
पिंपरी :एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनच्या पुढाकाराने आप्पा भानसे शिक्षण संस्थेच्या न्यू एंजल इंग्लिश स्कूल, तळवडे येथे विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाल पर्यावरण संस्कार समितीची स्थापना करण्यात आली. प्रसंगी शाळेतील 30 विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून निवडण्यात आले. त्यांना पर्यावरण पूरक साहित्य मोफत देण्यात आले. शाळेला पर्यावरण पूरक उपक्रमासाठी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) मार्फत सहकार्य करण्याबाबत शाळेला आश्वासन देण्यात आले. कार्यक्रमासाठी 350 विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या आवारात 25 देशी प्रजातीची झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. बकुळ, कडुलिंब सारक्या 10 फुट उंचीच्या झाडांचे रोपण नव्याने स्थापन केलेल्या बाल पर्यावरण संस्कार समितीच्या पर्यावरण दूतांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कचरा वर्गीकरणाबद्दल दिली माहिती
यावेळी नगरसेवक प्रवीण भालेकर, पर्यावरण तज्ञ विकास पाटील, शाळा संस्था संचालक अश्विनी स्वामी, सचिव प्रतिभा देवकुळे, विश्वस्त सायली भानसे, प्राचार्य वासंती हेगडे, पोलीस नागरिक मित्र बाबुराव फडतरे, राहुल श्रीवास्तव, इसिए स्वयंसेवक प्रभाकर मेरुकर, गोविंद चितोडकर आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या उद्यान विभागाच्या वृक्ष विभागाने सहकार्य केले आणि मार्गदर्शन केले. रोपण केलेल्या झाडांचे संवर्धन (वृक्ष पालकत्व) करण्याची जबाबदारी शाळेने स्वीकारल्याबाबत लिखित आश्वासन इसिएने शाळेकडून घेतले आहे. झाडांना पालक मिळाल्याने त्याचे संवर्धन होणार असल्याचे समाधान विकास पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी घनकचरा वर्गीकरण व घटक कचरा संकलन याबाबत सविस्तर पण सोप्या शब्दातून विद्यार्थ्यांना माहिती दिली.