A smallholder farmer of Balad dies of snake bite पाचोरा : शेतात फवारणी सुरू असताना शेतकर्यास सर्पदंश झाल्याने शेतकर्याचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील बाळद बुद्रुक येथे घडली. पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रवींद्र पुंडलिक सोमवंशी (42, बाळद, ता.पाचोरा) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
शेतात ओढवला मृत्यू
जळगाव तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील रवींद्र पुंडलिक सोमवंशी (42) हे शुक्रवार, 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पिकास फवारणी करत असतांना त्यांना अचानक विषारी सर्पाने चावा घेतला. त्यातच त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.
मयत शेतकरी अल्पभूधारक शेतकरी
मयत रवींद्र सोमवंशी यांच्या पश्चात्य वृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे. मयत शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी असल्याचे सांगण्यात आले.