बाळासाहेबांची शिवसेना पाठीवर वार करत नव्हती-मुख्यमंत्री

0

पालघर – पालघर लोकसभा पोटनिवडणूक अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर येथे राजकीय वातावरण तापलेले असून विविध पक्षांनी प्रचार यंत्रणेत गती आणलेली आहे. प्रचारसभेसाठी काल भाजपचे दिग्गज बोईसर येथे एका मंचावर झळकले. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. बाळासाहेबांची शिवसेना छातीवर वार करत होती पाठीवर नाही. परंतू आताची शिवसेना षड्यंत्र करण्यात पुढे आहे, असे आरोपही मुख्यमंत्री यावेळी केले. . महलातून बाहेर या आणि झोपडीत जावून विकास बघा असा सरळ वार त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केला.

भगवा रंग खंडणीखोरांचा केला

शिवसेनेला वनगा परिवाराचे अश्रू आत्ताच दिसले, या अगोदर ते त्यांच्याघरी का गेले नाहीत. शिवसेनेने यांच्या अश्रूंचे भांडवल केले आहे . गावितांचा विजय हीच दिवंगत वनगा यांना खरी श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले. शिवसेनेचे रक्त भगवे आणि गावितांचे हिरवे या शिवसेनेच्या टीकेसही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. वणगांचा भगवा रंग हा त्यांच्या त्यागाचा व समर्पणाचा आहे, सर्वांचे रक्त लाल असते पण काहींनी भगवा रंग खंडणीखोरांचा केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी लावला.

यांची होती उपस्थिती

सर्व गरिबांना २०१९ पर्यंत छत मिळणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी या सभेला ग्रामविकास मंत्री पंकजा मुढेही उपस्थित होत्या. बोईसर ग्रामपंचायत न राहता लवकरच नगरपालिका होई ल आणि वंजारी समाजाचा विकास होईल असे संबोधन त्यांनी यावेळी केले. या प्रचारसभेला केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, आदिवासी मंत्री विष्णू सवरा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार कपिल पाटील, विवेक पंडीत, राज पुरोहित, उत्तरप्रदेश चे खासदार रामचरित्र निषाद, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार मनीषा चौधरी, मुंबई बँकेचे प्रवीण दरेकर, कामगार नेते विजय कांबळे, बोईसर मंडळ अध्यक्ष महावीर जैन, जी प सभापती वीणा देधमुख, राजेंद्र राठोड, कृषी सभापती अशोक वडे, व इतर वरिष्ठ व स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती.