बावधनमध्ये एकाची 30 लाखांची फसवणूक

0

पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने

चिंचवड : एसबीआय लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीचे पैसे फंडामध्ये गुंतवणूक करून दुप्पट, तिप्पट करून देण्याच्या आमिषाने फसवणूक करण्यात आली. एकाची 30 लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जुलै 2011 ते मार्च 2018 या कालावधीत ऑनलाईन माध्यमाद्वारे घडली. याप्रकरणी मनोज पांडे (वय 53, रा. शिंदेनगर, बावधन खुर्द) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वीमा एजंट, दोन महिला आणि 20 एजंट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे मनोज यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे एसबीआय लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी काढली होती. त्याचे त्यांना 30 लाख रूपये मिळाले होते. हे पैसे फंडामध्ये गुंतवणूक करून दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष मनोज याला संबंधित विमा एजंटने दाखवले. त्यानुसार मनोज यांनी पैसे गुंतवले असता त्याची 30 लाखांची फसवणूक करण्यात आली. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.