बावधनमध्ये भरणार आठवडे बाजार

0

बावधन । नागरिकांना आपल्या घराजवळच स्वस्त, ताजा व स्वच्छ भाजीपाला मिळावा, तसेच शेतकर्‍यांनही आपला शेतमाल स्वत: विक्री करता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने बावधन येथील एलएमडी चौकात बावधन-कोथरूड प्रभाग समितीचे अध्यक्ष नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या पुढाकारातून संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यात आला.

महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या शेतकरी आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शहर सुधारणा समितीचे उपाध्यक्ष नगरसेवक किरण दगडे पाटील, नागरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे, अल्पना बरपे, बबन दगडे-पाटील, पवन सतदेवे, मनोज पांडे अरूण कोतूळकर, दिलीप पुराणिक, निधी भाटिया, धनंजय दगडे, नितीन दगडे, अरूण पाटील, शैलेश वेडेपाटील, उदय दाणी, श्रीकृष्ण राळे, सुरेश भगत, जीगिषा भरूचा यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. दर मंगळवारी दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यत हा बाजार भरणार असून, बाजारामध्ये भाजीपाला, भळभाज्या, फळे, धान्य, कडधान्ये, सेंद्रिय व गावरान भाजीपाला, दूध व दुग्धजन्यपदार्थ, मध, चटणी, मसाले, लोणचे, पापड आदी शेतकर्‍यांनी उत्पादित केलेले पदार्थ उपलब्ध असणार असल्याचे वेडेपाटील यांनी यावेळी सांगितले.