बिंद्राने टॅाप्सचे पद सोडले

0

नवी दिल्ली । बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने केंद्रिय क्रीडा मंत्रालयाच्या लोकप्रिय असलेल्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप्स) समितीच्या प्रमुखपदाचा राजिनामा दिला आहे. देशातील एकमेव वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बिंद्राने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. बिंद्राने एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले की, एका वैयक्तिक उपक्रमावर काम करण्यासाठी पद सोडत आहे. सरकारी पदावर राहीलो तर परस्पर हितसंबधाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. नवीन वर्ष माझ्यासाठी नवीन आशा घेऊन येत आहे. देशभरात सुरु करण्यात येणार्‍या बिंद्रा सेंटरवर मला मेहनत घ्यायची आहे. सार्वजनिक पदांचा मी राजीनामा देत आहे. त्यात नेमबाजीचे निरीक्शक आणि टॉप्सच्या प्रमुखपदाचा समावेश आहे. बिंद्राकडे यावर्षी जानेवारी महिन्यात टॉप्सच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या समितीत दिग्गज धावपटू पी टी उषा आणि बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण यांचा समावेश आहे.