बिअर शॉपी फोडून 72 हजारांची दारु चोरीला : चिंचोलीतील घटना

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथील बिअर शॉपी फोडून चोरट्यांनी 72 हजार रुपये किंमतीचे दारूचे बॉक्स लांबवले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील सागर वासूदेव लाड (24) यांचे गावातील हॉटेल सायलीमागे सागर बिअर शॉपी आहे. मंगळवार, 3 मे रोजी रात्री 10 वाजता नेहमीप्रमाणे शॉपी बंद करून घरी गेले. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बिअर शॉपी फोडून सुमारे 72 हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार बुधवार, 4 मे रोजी सकाळी 10.30 वाजता उघडकीला आला. सागर लाड यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.