बिग-बी म्हणाले ‘मला पुन्हा बोलवू नका’; ममता बनर्जी म्हणाल्या बोलविणार !

0

कोलकाता-बॉलीवूडचे महानायक बिग-बी अमिताभ बच्चन आजही वयाच्या ७६ वर्ष झाले असतांना विविध कार्यक्रम आणि इवेन्टमध्ये हजेरी लावतात. दरम्यान पश्चिम बंगालचे जावाई असलेले अमिताभ बच्चन कोलकाता येथे मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या विनंतीला मान देत २४ व्या कोलकाता इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलच्या एका कार्यक्रमाला गेले होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना मला पुन्हा अशा कार्यक्रमाला बोलवू नका अशी विनंती केली मात्र बनर्जी ह्यांनी बोलवणार असे सांगितले. हा व्हिडीयो सोशल मिडीयावर खूपच व्हायरल होत आहे.

वास्तविक कार्यक्रमात भाषण देतांना बिग-बी मिस्कील अंदाजात मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना उद्देशून म्हणाले की ‘मला पुन्हा निमंत्रण देऊ नका, कारण माझ्याकडे बोलायला काहीही विषय नसतात. परंतू ममताजी ऐकत नाही, त्यामुळे मला यावे लागते. हे ऐकून ममता बनर्जी व्यासपीठावरून बोलल्या मी पुन्हा बोलावणार.