नंदुरबार। ता लुक्यातील नवागाव येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे रोहिणी नक्षत्रांच्या सुरूवातीस जिल्हास्तरीय उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवाडा कार्यक्रमांचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे सदस्य देवमन चौरे, जिल्हा कृषी अधिक्षक सुभाष नागरे, विभागीय विस्तार केंद्र धुळेचे डॉ.मुरलीधर महाजन, श्रीधर देसले, डॉ.अविनाश कोळगे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक प्रा.राजेंद्र दहातोंडे, जयंत उत्तरवार, उपविभागीय कृषि अधिकारी रमेश शिंदे, प्रकल्प उपसंचालक प्रदीप लाटे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले आदी उपस्थित होते. शेतकरी सभेचे प्रास्ताविकात महाले यांनी उन्नतशेती-समृद्ध शेतकरी पंधरवाड्यांचे नियोजन व नवागावचे खरीप हंगामाविषयी नियोजनाची माहिती दिली.
जोडधंदा म्हणून लघुउद्योग : राजेंद्र दहातोंडे यांनी शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून लघुउद्योग उभारणीविषयी माहिती दिली. डॉ.कोळगे यांनी मका लागवड तंत्रज्ञान विषयी सखोल मार्गदर्शन केल. डॉ.मुरलीधर महाजन यांनी कापूस, बाजरी, ज्वारी या पिकांची कमी उत्पादकतेच्या बाबींवर विश्लेषण करून चालू हंगामात उत्पादन वाढीसाठी बिजप्रक्रीया, खत व्यवस्थापन व कीड रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष धरमदास बागुल यांनी कंपनीच्या वाटचालीबद्दल मनोगतातून शेतकरी गटस्थापनातून विक्री व्यवस्थापनाचे फायदे विषद केले. जिल्हा कृषी अधिक्षक सुभाष नगरे यांनी कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी बियाणे उपलब्धता, गुणक्त तसेच आधारकार्ड लिंक यांसह उत्पादकता वाढीसाठी होणारे फायदेविषयी मार्गदर्शन केले.
कृषी वार्ताफलकांचे उद्घाटन
अनिल पवार यांनी कृषी विभागांच्या योजनांचा लाभ सर्व शेतकर्यांनी जास्तीत जास्त घेण्याचे आवाहन कार्यक्रमात कडधान्य उत्पादन तंत्रज्ञान व मुग-उडीद पिकावरील किडींचे व्यवस्थापन या पुस्तिका व घडी पुस्तिकेचे प्रकाशन व कृषी वार्ताफलकांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी एस.एस.राजपूत, बी.एम.पवार, एन.डी.पवार, कृषी पर्यवेक्षक आर.यु.पाटील, संदीप पाटोळे, एस.बी.चौरे, एच.सी.हिरे, आर.व्ही.मोरे उपस्थित होते. आयोजन कृषी सहाय्यक ए.जे.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन करणसिंग गिरासे, तर आभार जितेंद्र धगधगे यांनी मानले.