बिजलीनगर अंडरपासच्या कामाला लवकरच सुरुवात

0

वाहतूक कोंडी होणार नाही

चिंचवड : प्रभाग क्रमांक 17 मधील बिजलीनगर ब्रिजच्या शेजारून अंडरपास बांधण्यात येणार आहे. लवकरच या कामाचे उदघाटन होणार आहे. या अंडरपासच्या कामासाठी 13 कोटी 21 लाख 84 हजार 190 रुपये खर्च येणार असून हे काम कृष्णाई इन्फ्रा.प्रा.लि.कंपनीस देण्यात आले आहे. प्राधिकरणात अनेक नामांकित कॉलेज व शाळा आहेत. या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना व नागरिकांना अवजड वाहनांचा देखील सामना करावा लागत होता. त्यासाठी हा अंडरपास तयार करण्यात येत आहे.

वाहतूक कोंडी होणार नाही
हिंजवडी आयटी कंपनीत कर्मचार्‍यांना ये- जा करणार्‍या वाहनांची होणारी वर्दळ आकुर्डी रेल्वे स्टेशन हा प्रश्‍न कायमचा निर्माण झाला होता. या ठिकाणाहून वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत असल्याने या सर्व बाबी लक्षात घेऊन नगरसेवक नामदेवराव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, स्थायी समिती सदस्य मोना कुलकर्णी यांच्या निवडणुकीच्या पहिल्याच वर्षीच्या प्रयत्नाने अंडरपास मंजूर करण्यात आला आहे. हे काम नगरसेवक नामदेवराव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, करुणा शेखर चिंचवडे, स्थायी समितीच्या सदस्य मोना कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याने होणार आहे. या विकास कामांमुळे या रस्त्यांवरील होणारी वाहतूक कोंडी दूर होणार असून नागरिकांकडून या कामाबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.