चिंचवड : बिजलीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा शुक्रवारी (दि. 19) वर्धापनदिन आहे. यानिमित्त काशीधाम मंगल कार्यालयात सकाळी नऊपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हभप किसन महाराज चौधरी प्रमुख पाहुणे असून अध्यक्षस्थानी नगरसेवक भाऊसाहेब भोईर असतील. या सोहळ्यात क्षितीज स्मरणिकेचे प्रकाशन, वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांचा, तसेच विवाहास 50 वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्याचा सत्कार करण्यात येणार आहे. संघाचे अध्यक्ष प्रकाश निसळ व कार्याध्यक्ष जयवंत भोसले यांनी ही माहिती दिली आहे.