नवापूर । अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई संचलित सरस्वती संगीत विद्यालय नंदुरबार, केंद्रातून नवापुर जि. नंदुरबार येथील बिजल राणाने हार्मोनियम विषयातून संगीत विशारद पदवी प्राप्त केली आहे. अतिशय कठीण परिश्रम व चिकाटीने यश संपादन केल्यामुळे संचालिका सविता कुलकर्णी व गुरुवर्य गोविंद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. बिजल संगीत विशारद होणारी राणा समाजातील पहिली मुलगी आहे. नवापूर तालुक्यातून 17 व्या वर्षी इतक्या कमी वयात हा सन्मान तिने पटकाविला आहे.
7 परीक्षांमध्ये कठोर परिश्रम
संगीत विशारद करिता आवश्यक 7 परीक्षांमध्ये बिजलने कठोर परिश्रम घेतले आहे, प्राथमिक शिक्षक भानुदास रामोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे संगीत शिक्षण पूर्ण झाले आहे. सरस्वती संगीत विद्यालय नंदुरबार येथील संचालिका व गुरुवर्य यांचेही मार्गदर्शन बिजलला लाभले. बिजल राणा ओबीसी संवर्गातील असून या मधून खूप कमी मुली संगीत विशारद झाल्या आहेत, लहान पणापासूनच बिजल राणा सर्व क्षेत्रात पुढे आहे. बिजल ही नवापूर येथील सुप्रसिद्ध एस.टी.पी अकाऊंट रायटर व कर सल्लागार राकेशभाई राणा यांची कन्या आहे. परिवाराने पूर्णतः आध्यात्मिक कार्यात वाहून घेतले आहे. राकेशभाई राणा हे दत्त भक्त मंडळ नवापूर चे अध्यक्ष आहेत. धार्मिक कार्यक्रमात बिजल सुरुवातीपासून हार्मोनियम वाजवत आहे. सांगीतिक विविध स्पर्धांमध्ये तिने बहुतांश वेळा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे