बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला; शेतकरी भयभीत

0

शिंदखेडा । तालुक्यातील सुकवद गावात रविवार, 1 रोजी बिबट्याने आन्ना पाटील या शेतकर्‍यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. वन विभागाला कळवून देखील अद्याप पावेतो कुठलीही कार्यवाही न केल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, तालुकाप्रमुख विश्‍वनाथ पाटील, छोटू पाटील, सर्जेराव पाटील, शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, सागर देसले, सुकवद विकास सोसायटीचे चेअरमन विश्‍वासराव पाटील आदी आज शिंदखेडा क्षत्रिय वनपाल कार्यालयात जाऊन निवेदन देण्यासाठी गेले असता कार्यालयात केवळ लिपिक व शिपाई व वनरक्षक जयश्री पाटील उपस्थित होते. मुख्यालयाला अधिकारी हजर नसल्याने शिवसेनेचे पदाधिकारींनी आंदोलन केले.

सुकवद शेत शिवारात नदीच्या काठी मोठ्या प्रमाणावर बाभळाची झाडे आहेत, यामुळे रा ठिकाणी या प्राण्यांना लपण्यास मोठी जागा आहे. त्यामुळे सदर प्राण्यांच्या शोध घेणे कठीण आह. तरी रा बाभूळ तोडण्रासाठी शासन स्तरावरून कार्यवाही व्हावी.
– हेमंत साळुंके, शिवसेना, जिल्हाप्रमुख

या ठिकाणी वनपाल यांना थांबवून फटाके फोडणे, धूर करून संबंधित वन्य प्राण्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत असुन जिल्हा वनक्षेत्र अधिकारी यांचेकडे वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी पिंजर्‍याची मागणी करीत आहोत. ते उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावण्यात येईल.
– श्री. माने, परिक्षेत्र अधिकारी