रांजणगाव । शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा गावातील शिवारात बिबट्या सदृश प्राण्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले असून गणेगाव खालसा शिवारात पिंजरे बसवण्यात यावे, अशी मागाणी ग्रामस्थांनी केली आहे.
गणेगाव खालसा शिवारात चासकमान कालव्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऊस लावगड मोठ्या प्रमाणात केली आहे. या वाढलेल्या ऊस क्षेत्रामुळे बिबट्याला लपून राहण्यासाठी भरपूर क्षेत्र उपलब्ध होत असल्याने गणेगाव खालसा, वरुडे, वाघाळे, बुरुंजवाडी येथील शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरीक भयभीत झाले आहेत. शेतामधील कामावरही या गोष्टींचा परिणाम झाल्याचे पंकज बांगर, संभाजी झांजे यांनी सांगितले. मात्र, याबाबत वन विभागाच्या अधिकार्यांची संपर्क साधाला असता या ठिकाणी बिबट्या नसून तरस असल्याचे सांगितले आहे. ग्रामस्थ मात्र, या शिवारात बिबट्याच असून प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगत आहेत.