चाळीसगाव । तालुक्यातील वरखेडे येथील पळसमनी शिवारातील एका शेतकर्याच्या शेतात 10 ते 12 मजूरांसह कपासाच्या शेतात काम करत असतांना 55 वर्षीय महिलेवर मागून येवून अचानक केलेल्या हल्ल्यात महिला ठार झाली आहे. या घटनेची माहिती मिळताचा वनविभागातील कर्मचार्यांना घटनास्थळी धाव घेतली आहे. चाळीसगाव तालुक्यातील बिबट्याच्या या हल्ल्यातील हा पाचवा बळी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वरखेडे येथील पळसमनी शिवारात गिरणा तीराजवळ असलेल्या अमर नाईक यांच्या शेताजवळ असलेल्या शेतात सुसाबाई धना नाईक (भील) (वय-55) ह्या 10 ते 12 मजूरांसोबत शेतात काम करत असतांना मागून अचानक असलेल्या बिबट्याने हल्ला चढविला. त्यानंतर बिबट्याने महिलेला ओढून नेत त्यांच्या डोक्याचा मागचा भाग कोरून खाल्ला आहे. या घटनेमुळे शेतात काम करणार्या इतर मजूरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आत्तापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू
चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने चांगलीच दहशत पसरवली असून आजचा हा पाचवा बळी आहे. तालुक्यातील उंबरखेड, पिलखोड, वरखेडे, देशमुख वाडी, अलवाडी, पिंपरखेड, हातले, वाघले, पिंपळवाढ, म्हाळसा आदि भागात बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. बिबट्याच्या वेगवेगळ्या हल्ल्यात चार जणांचा बळी गेला आहे. यात 8 जुलै 2017 रोजी काटेवाडी कुटुंबातील 8 वर्षीय बालकावर हल्ला केल्याने त्याचा शेतात मृत्यू झाला. त्यानंतर 11 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या हल्ल्यात उंबरखेड येथील महिलेचा मृत्यू झाला. 11 नोव्हेंबर 2017 रोजी देशमुखवाडी येथे मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केल्याने एका मुलाचा मृत्यु झाला होता. व 15 नोव्हेंबर 2017 रोजी वरखेडे येथील कापुस वेचणार्या महिलेवर हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झाला. यासह जवळपास 5 जणावर हल्ला केल्याने ते जखमी झाले आहेत. यासह अनेक मेंढ्या, बकर्या व जनावरे या बिबट्याने फस्त केल्याच्या घटना ताज्या असतांना तालुका भयभीत झाला आहे. 21 नोव्हेंबर रोजी पुन्हा बिबट्याने घोड्यावर हल्ला करुन त्यात घोड्याचा मृत्यू झाला होता.