बिबट्याच्या हल्ल्यात 14 शेळ्या ठार

0

नवापूर तालुक्यातील वासरवेल येथील घटना; घटनास्थळी पंचनामा

नवापुर । तालुक्यातील मौजे वासरवेल येथे रात्री 2 वाजेचा सुमारास संतोष धनसिंग गावीत यांचा मालकीचा शेतात असलेला गोटफार्मात 14 शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करुन शेळ्यांना ठार केले आहे. ही घटना सकाळी 5 वाजता संतोष गावीत यांचा लक्षात आली. पक्षु वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश पाडवी यांच्याशी संपर्क करुन माहिती देण्यात आली. वैद्यकीर अधिका-यांनी घटनेची पहाणी केली. घटनास्थळी वनक्षेत्रपाल आर.बी पवार, वनपाल राजु जगताप यांनी पंचनामा केला. या ठिकाणी बिबट्याचा पायाचे ठसे दिसुन आले आहे.

60 ते 70 हजाराचे नुकसान
याठिकाणी दोन ते तीन बिबटे आल्याचा संशय वनविभागाचा कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे. बिबटे हे ताराचा कंपाऊड वरुन उडी मारुन गोटफॉम मध्ये शिरले असल्यांचा अंदाज वासरवेल गावाचा ग्रामस्थ व्यक्त केला आहे. 60 ते 70 हजाराचे नुकसान झाल्यांचे अंदाज मालक संतोष गावीत यांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थ आर.टी गावीत, शंकर गावीत, राजु गावीत यांनी घटनास्थळी मदत केली. वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.