जळगाव । शिरसोली येथील नायगाव शिवारात शेतात गोठ्यात बांधलेल्या गायीवर बिबट्यांने हल्ला चढवित तिला ठार केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावाता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हरिश शंकर पाटील यांच्या नायगाव शिवारातील शेतामध्ये असलेल्या गोठ्यातील गायीवर बिबट्याने हल्ला चढवित गाय फस्त केली़ याघटनेने गावासह परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक असे की, शिरसोली येथील रहिवासी हरिश शंकर पाटील यांच्या मालकीचे शेत नायगाव शिवारात आहे, ते आपले गुरे नेहमी शेतातील गोठ्यात बांधतात. कालही नेहमी प्रमाणे त्यांनी आपली गुरे चारापाणी करून गोठ्यात बांधली होती. पहाटेच्या सुमारास हरीष पाटील हे गुरांना चारा पाणी देण्यासाठी शेतात गेले असता त्यांना गोठ्यामधील गाय गतप्राण अवस्थेत आढळून आली़तिच्या गळ्याजवळील भागास मोठी जखम झालेली होती. या पध्दतीच्या जखमा बिबट्याच्या हल्ल्यातच होतात, असा त्यांचा अंदाज असल्याने त्यांनी ही माहिती लागलीच पोलिस पाटील शरद राजाराम पाटील यांना दिली.
वनविभगाचे पथक घटनास्थळी
पोलिस पाटलांनी माहिती तात्काळ पोलिस विभागास व वनविभागास दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी भारूळे कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता व गायीच्या जखमांची तपासणी केली असता हा हल्ला बिबट्याचाच असल्याचा त्यांनी उपस्थितांना सांगीतले. दरम्यानएमआयडीसी पोलिस घटनास्थळी पोहचले उशिरापर्यंत पाहचले नसल्याचे समजते.