बिबट्याने पाडला नीलगायीचा फडशा

0
वनविभागाच्या ट्रॅप कॅमेर्‍यात बिबट्या झाला कैद
मुक्ताईनगर : तालुक्यातील इच्छापूर-निमखेडी येथील शेतकरी रामेश्वर पाटील यांच्या शेतात बिबट्याने नीलगायीचा फडशा पाडला. या बाबत माहिती कळताच वढोदा वनपरीक्षाचे अधिकारी अमोल चव्हाण, वनपाल शेजोळेे व वनरक्षक डी.जी.पाचपांडे यांनी पाहणी केली. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यात बिबट्याची छबी कैद झाली आहे. 10 मार्च रोजी  संध्याकाळी 7.12 मिनिटांनी शिकार करण्यासाठी बिबट्या आल्याची छबी कॅमेर्‍यात कैद झाली आहे. शेतकर्‍यांनी रात्री-अपरात्री शेतात व जंगलाच्या दिशेने जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा वनविभाने दिला आहे.