चाळीसगाव – घरातील लोक बाहेर ओट्यावर झोपल्याचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील बिलाखेड येथील घराच्या मागील दरवाजाची कडी तोडुन घरातील कपाटातील ३२ हजार ३५० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागीने व १८५० रुपये रोख असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना दिनांक ५/९/२०१८ च्या रात्री १० ते ६ रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान घडली असुन आनंद प्रदीप पाटील रा बिलाखेड ता चाळीसगाव यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार बापूराव भोसले करीत आहेत.