बिहारी लोक राहतात इकडे आणि मुलं होतात तिकडे; भाजप आमदार धस यांचे वादग्रस्त वक्तव्य

0

मुंबई- बिहारी लोक राहतात इकडे आणि तिकडे त्यांच्या बायकांना मुले होतात, असे खळबळजनक वक्तव्य बीडचे विधान परिषद भाजपा आमदार सुरेश धस यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

बिहारचे लोक राहतात महाराष्ट्रात आणि बायकोला तिकडे मुलगा झाला म्हणून पेढे वाटत फिरतात असे विधान त्यांनी केले आहे. एका जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. यापूर्वीही भाजपाचे विधान परिषदेतील सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनीही प्रचार सभेत लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता सुरेश धस यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.