बीएचआर गैरव्यवहार प्रकरणातील सूरज झंवर याचा जामीन मंजूर

जळगाव- बीएचआर गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी सूरज झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा
मिळाला असून त्याचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगरातील गुन्ह्यात पुणे आर्थिक शाखेने केलेल्या तपासात सूरज झंवर याचा गैरव्यवहार प्रक रणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सूरज झंवर यास त्याच्या जळगावातील जयनगरातील राहत्या घरी अटक करण्यात आली होती. त्याने सुप्रीम कोर्टातही जामीनसाठी अर्ज केला होता. परंतु, हा अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला. यानंतर त्यान मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्याचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे.