जळगाव। भारत देशात दुरसंचार क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्रांती केली आहे. दुरसंचार क्षेत्रात अव्वल असलेल्या जगातील निवडक देशाच्या यादीत भारताचा समावेश आहे. सध्या भारतात इंटरनेटची 4 जी सेवा सुरु आहे. बीएसएनएल भारतातील शासकीय दुरसंचार कंपनी आहे. ही कंपनी सर्वात जुनी आहे. मात्र देशात खाजगी कंपनीच्या वाढत्या संख्येमुळे बीएसएनलचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. शासन बीएसएनलएने खाजगी कंपनी प्रमाणे सेवा पुरवावे यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे.
खासदारांनी घेतली बैठक
भारत संचार निगम लिमिटेड महाप्रबंधक कार्यालयात शनिवारी 13 रोजी दूरसंचार सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए.टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला जळगांव बिझीनेस एरीया प्रमुख ए.के.अहिरवार, तसेच एम.व्ही. मुंडे, डी.जी.ढाके, शिरीष बयास, दत्तात्रय पाटील, जुलाल पाटील, शांताराम पाटील , दिपक सुर्यवंशी, राजेंद्र चौधरी आदींसह जिल्ह्यातील मंडल अभियंता स्तरावरील बी.एस.एन.एल.चे अधिकारी उपस्थित होते.
क्षेत्रनिहाय आढावा
भारत संचार निगम लिमिटेडच्या बैठकीत जिल्ह्यातील दुसंचार कार्यालयाचा विभाग निहाय आढावा घेण्यात आला. बैठकीत सदस्यांनी आपापल्या क्षेत्रातील दूरसंचार सेवेतील समस्या मांडली. अधिकार्यांनी तक्रार तसेच शंकेचे निरसन केले. खासदार ए.टी.पाटील यांनी समस्या ऐकुन घेत समस्या सोडवण्यासाठी दूरसंचार विभागाला मार्गदर्शन केले.