‘बीएसएनएल’ कर्मचार्‍यांचे नवीन वेतनासाठी धरणे

0

जळगाव। दूरसंचार निगम लिमिटेडमधील (बीएसएनएल) कर्मचार्‍यांना एक जानेवारी 2017 पासून नवा वेतनकरार लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी ‘बीएसएनएल’मधील कर्मचार्‍यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

‘बीएसएनएल’ मधील सर्व प्रमुख कर्मचारी व अधिकारी संघटना ‘बीएसएनएलईयू’, ‘एसएनईए’, ‘एसएनएटीटीए’ यांसह अन्य संघटनातर्फे ‘बीएसएनएल’ महाप्रबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यांचा होता आंदोलनात सहभाग
आंदोलनात निलेश काळे, एल. यु. चौधरी, व्ही.एस. सोनवणे, प्रदीप सोनवणे, वसीम अहमद, अभिजित पाटील, शशिकांत सोनवणे, एम.पी.पाटील, नारायण वैद्यकर, निंबा मोरे, व्ही.एच. सदांशिव,व्ही.जी.मोकाशी, प्रदीप चांगरे शालीक पाटील, एस.एस. कुलकर्णी, विकास बोंडे, आर. जी. नारखेडे, अशोक चौधरी, डी.जी. डहाके, आर.एस. नेहते, अमित कुलकर्णी, पी.डी.पाटील, , नितीन रस्से, तुकाराम लोखंडे, एम.ए. कोळंखे आदीसह पदाधिकार्‍यांचा सहभाग होता. आंदोलनाद्वारे प्रामुख्याने जानेवापासून नवन वेतनकरार लागू करणे, एक जानेवारी 2017 पासून पेन्शन रिव्हीजन करणे, थेट भरती, अधिकारी व कर्मचार्‍यांचे निवृत्ती लाभ निश्‍चित करा आणि ट्रेड युनियन गतिविधीवरील कार्यक्रम हटविण्याची मागणी करण्यात आली.