जळगाव । अखिल भारतीय बीएसएनएल/डिओटी पेन्शनर्स असोशिएशन नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा शाखेतर्फे धरणा आंदोलन करण्यात आले. शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोर जिल्ह्यातील पेन्शनर्सधारकांतर्फे आंदोलन करण्यात आले. त्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या प्रामुख्याने 1 जानेवारी 2017 पासून बीएसएनएल पेन्शनर्सना सुधारित दराने पेन्शन लागू करावी, डीओटी पेन्शनर्सच्या पेन्शन रिव्हीजन केसेस त्वरित सोडविण्यात याव्यात, सर्व पेन्शनर्सला दरमहा दोन हजार रूपयांचा मेडीकल भत्ता मंजूर करण्यात यावा यांसह इतर मागण्या त्यांना निवेदनात नमूद केल्या आहेत.
आंदोलनात यांनी घेतला सहभाग
धरणे आंदोलन यशस्वितेसाठी महाराष्ट्र सर्कलचे सके्रटरी आर.एन.पाटील, महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष ए.आर.पाटील, जिल्हा सचिव एच.के.पाटील, एम.डी.बढे, एम.ए.खाचणे, सी.आर.पाटील, इ.ए.सरोदे, एस.जी.भोळे, पी.ओ.बाविस्कर, जे.व्ही.पाटील, व्ही.एस.पाटील, एम.एस.चौधरी, सी.एस.वाणी, जे.एन.पाटील, एम.टी.कोलते, भाईदास पाटील, व्ही.आर.नारखेडे, जे.एस.नारखेडे, पी.ई.पाटील, एस.डी.पाटील, आर.व्ही.भील, ए.एस.साखरे, ए.पी.भसीदास, ए.एस. चौधरी यांच्यासह आदी सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.