श्रीगोंदा- एकविसावे शतक म्हणजे आधुनिक प्रगत तंत्रज्ञान अन नवनवीन शोधांचे शतक म्हणावे तर हल्ली च्या जगात काल लागलेला शोध आज कालबाह्य होतो आहे. इंटरनेटची टु जी परीभाषा आता 5जी मध्ये रुपांतरीत होते आहे. आयडीया, एअरटेल, जिओ सारख्या खाजगी कंपन्या ग्राहकांन जास्तीत जास्त चांगल्या सोई उपलब्ध करुन देत आहेत. या तुलनेत बीएसएनएल मात्र लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना दिसुन येत नाही. बीएसएनएलचे टाॅवर तर केवळ शोभेचे बाहुलेच बनुन राहीले असल्याचे चित्र सध्या श्रीगोंदा तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये दिसुन येते आहे.
हे देखील वाचा
श्रीगोंदा तालुक्यातील पुर्व भागात तर या शासकीय सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक टेलिफोन एक्सचेंज ची सर्वीस पूर्णपणे ठप्प झाली आहे..सेवा सुरु झालीच तर त्या सेवेतुन इंटरनेट ला स्पीडच मिळत नसल्याचेही चित्र समोर आले आहे. ही दुरावस्था ब्राॅडबॅन्ड, लॅन्डलाईन बाबत जास्तीची आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पुर्व भागात विवीध शासकीय, सहकारी बँकां, पतसंस्था कार्यरत आहेत. या जवळपास सर्व संस्था ऑनलाईन पद्धतीने काम करतात, पण बीएसएनएलची सेवा मागील चार-पाच दिवसांपासुन पुर्णतः विस्कळीत झाल्याने या परीसरातील लोकांचे आर्थिक व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहेत.