बीएसएन एलचा 258 रुपयांत 153 जीबी डेटा

0

मुंबई । बीएसएनएलने आपल्या ग्रांहकांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये 258 रुपयांमध्ये 153 जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 51 दिवसांची असून यामध्ये रोज 3 जीबी डेटा वापरण्याला परवानगी आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या मुहूर्तावर ही ऑफर जाहीर करण्यात आल्याचेही कंपनीने सांगितले आहे. ही ऑफर सध्या बाजारात असलेल्या जिओच्या ऑफरला टक्कर देईल अशी चर्चा आहे.

ग्राहकांसाठी खास ऑफर
भारतभर टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या प्रचंड प्राइस वॉर सुरू आहे. दररोज प्रत्येक कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर जाहीर करत त्यांना खूश करायचे ठरवले आहे.